Author: Sunila Patil

Marathi

त्या तिथे पलिकडे… स्वर्ग तो, तिथे मनास सापडे!

ही रूम मी सर्वप्रथम बघितली तेव्हा ती जगावेगळी तर वाटलीच पण माझ्या मनात एक शंका आली की, जसे आपल्याला बाहेरचे सर्व काही दिसत आहे, तसे ह्या रूममध्ये राहिल्यावर बाहेरच्यांनासुद्धा रूममधील सर्व काही दिसत असेल नाही का! पण त्याक्षणीच मनात आले, अरे आपण तर एखाद्या काचेच्या स्नो ग्लोबमधल्या खेळण्यासारखेच त्या ग्लास […]

Marathi

वर्ल्ड ऑन व्हील्स

ट्रेनमध्ये स्मोकिंगवर बंदी आहे हे माहिती होते पण बोलण्यावरसुद्धा, हे ऐकून मी चकित झाले. न बोलता प्रवास करणे तर मला झेपणारच नव्हते. तेवढ्यात तिने त्या ट्रेन कंपार्टमेंटवरची खूण दाखवली. मी चुकून सायलंट कंपार्टमेंटमध्ये शिरले होते. इथे जोरात बोलण्यास व फोन वापरण्यास बंदी होती. तरीच हे कंपार्टमेंट एवढे रिकामे आहे ह्यामागचं […]

Marathi

द वर्ल्ड ऑफ लेक्स

आम्ही आमच्या गेस्टना सरळ- सोप्या भाषेत विचारतो की, कुठे जावेसे वाटते आणि काय करावेसे वाटते तुम्हाला हॉलिडेवर? तुम्हाला बीच आणि समुद्रकिनारा जास्त आवडतो की डोंगर-दर्‍या आणि तिथले तलाव. काही जणं आठवडाभर समुद्रकिनारी राहणे पसंत करतात तर कोणाला डोंगराची आणि हिल स्टेशनची ओढ असते. एकदा ही आवड कळली की मनासारखा हॉलिडे […]

Marathi

पिक्चर अभी बाकी है…

देशविदेशात अनेक ठिकाणी हिंदी सिनेमांचे छायाचित्रण केले जाते आणि आपल्याला नेत्रसुख प्राप्त होते. काही वेळा तर त्या जागेची जादू ही एखाद्या गाण्यातूनसुद्धा आपले मन जिंकते. तर काही वेळा आपण त्या डेस्टिनेशनला प्रत्यक्ष भेट देतो, तेव्हा मात्र ती जागा आपल्याला काही केल्या सापडतच नाही… असं का होतं? इटलीमध्ये सगळीकडे फिरलो पण […]

Marathi

लँड ऑफ सिल्व्हर

एक छान स्लीवलेस जॅकेट, टाय व हॅट घातलेला युवक माझ्याकडे हात पुढे करत आला आणि अचानक मला त्या संगीताच्या तालावर नाचवू लागला. त्याच्या असिस्टंटने माझ्या कानामागे एक फूल लावले, गळ्यात एक सुंदर स्कार्फ बांधला आणि बघता बघता मी चक्क रस्त्यावर डान्स करू लागले, माझ्या ह्या दोन मिनिटांच्या परफॉर्मन्सची मलाच खूप […]

Marathi

शब्दावाचून कळले सारे!

या गोष्टीला साधारण सतरा-अठरा वर्षं तरी झाली असतील पण आजसुद्धा ती ट्रिप आठवली की हसू येते. या ट्रिपवर मी टूर मॅनेजर होते आणि पर्यटकांना युरोप दाखविण्याचा माझा मनापासून प्रयत्न सुरू होता. त्यात पहिल्याच दिवशी मला धक्का बसला, जेव्हा बसबरोबर निकोला दिसला. साधारण मध्यम वयाचा सुदृढ बांध्याचा हसतमुख निकोला बसजवळ उभा […]